Thursday, May 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आदिवासी संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे – मधुकर पिचड

---Advertisement---

---Advertisement---

जुन्नर : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी लढा उभारणार असल्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी तळेरान (ता. जुन्नर) येथे बोलताना सांगितले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी समाज समन्वय समिती व आदिवासी समाज प्रबोधिनी (जुन्नर) यांनी डॉ. गोविंद गारे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था असे नामकरण व्हावे, अशी मागणी केली असल्याचे पिचड यांनी सांगितले.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोविंद साबळे यांच्या मातोश्रींच्या निधनानिमित्त तळेरान येथे आयोजित शोकसभेत समाजाला मार्गदर्शन करताना पिचड बोलत होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याची मागणी, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

बिग ब्रेकिंग : ‘तिने’ रचला इतिहास, ‘झाली सर्वात तरूण आदिवासी उपमहापौर’

पिचड म्हणाले, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्वायत्त आहे परंतु बार्टीप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देत नाही किंवा त्यांच्यासाठी योजना आखत नाही.

आदिवासी समाजासाठी ९ टक्के बजेट असताना मागील पाच वर्षात ११ हजार कोटी रुपये खर्चाविना पडून राहिले, ही आदिवासी समाजाची शोकांतिका आहे. संविधानात आदिवासी समाजासाठी अनुसूचित जाती प्रमाणे आरक्षण असावे, यासाठी संविधान समिती सदस्य डॉ. जयपाल मुंडा यांनी आग्रह धरला होता. त्यांनी तशी तरतूद केली असल्याने आदिवासी समाजाने डॉ. मुंडा यांना विसरता कामा नये, असेही ते म्हणाले.

हरिश्चंद्र गडावर सापडली जगातील सर्वात दुर्मिळ वनस्पती

यावेळी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ बगाड, माजी आमदार शरद सोनवणे, तुळशीराम भोईर, काळू शेळकंदे, काळू गागरे, मारुती वायाळ, भास्कर रेंगडे, रवींद्र तळपे आदी उपस्थित होते.

गायीच्या दुधाला 42 रूपये प्रति लिटर भाव द्या – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

आंबेगाव : आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधत दोन गावात ग्रंथालय सुरू


---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles