Saturday, April 20, 2024
Homeग्रामीण"तृषार्त" नियतकालिक आळंदी श्री ज्ञानेश्वर माउली चरणी सविनय सादर

“तृषार्त” नियतकालिक आळंदी श्री ज्ञानेश्वर माउली चरणी सविनय सादर

अहमदनगर/डॉ कुंडलिक पारधी : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस् , कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज शेवगाव येथील प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे  “तृषार्त ” नियतकालिक २०१९-२०२० चा ३६वा अंक “बाप विशेषांकाच्या” स्वरुपात साकारला असून या अंकाची सर्वञ प्रशंसा होत आहे. 

वै. श्री सद्गुरू जोग महाराज संस्थापित आळंदी वारकरी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक ह.भ.प.डॉ.तुकाराम महाराज मुळीक यांच्या पविञ हातात ” तृषार्त-बाप विशेषांक ” देतानाच कार्यकारी संपादक प्रा.डॉ.वसंत रघुनाथ शेंडगे यांनी हा अंक श्री ज्ञानेश्वरांच्या पवाञ चरणावरी सविनय सादर करा.अशी महाराजांना करुणा भाकली. 

“तृषार्त-बाप विशेषांकाचे अवलोकन करुन आपल्या अमृतवाणीतून तोंडभरून कौतूक करताना डॉ.मुळीक महाराज म्हणाले की, “महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे साहेब व त्यांचे सर्व सहकारी संपादक मंडळ, प्राध्यापक गुरुजन, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे अथक परिश्रम खय्राअर्थी मातृ-पितृ ऋणातून उतराई होण्याची ही आशावादी वाटचाल आहे.

“भव तरावया उत्तम ही नाव” व उद्धाराची नवी वाट ‘तृषार्त-बाप विशेषांकाने’  दाखविली आहे. प्रत्येकाच्या हाती हा अंक पडावा अशी अशा आहे. “प्रसंगी मृदंगाचार्य ह.भ.प.चंद्रशेखर महाराज मुरदारे, डॉ.कुंडलिक पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय