Monday, December 9, 2024
Homeराष्ट्रीय"आदिवासी हिंदू नही है" ट्विटरवर जोर

“आदिवासी हिंदू नही है” ट्विटरवर जोर

मुंबई : १९९४ मध्ये ‘युनो’ने जाहीर केल्या नुसार ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यातच आदिवासी दिन जवळ आल्याने ट्विटरवर “आदिवासी हिंदू नही है” हा ट्रेंड चालविला जात आहे. 

गेल्या काही वर्षांपासून देशातील आदिवासी हे हिंदू असल्याचा दावा काही संघटना सातत्याने करत आहेत, यावरून अनेकदा वादही होत असतात त्यामुळे आदिवासी दिन जवळ आल्याने ट्विटरवर “#आदिवासी_हिंदू _नही_है” तसेच “#विश्व_आदिवासी_दिवस_NH_हो” असे दोन ट्रेंड चालविले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी ‘आदिवासी हे हिंदू नाहीत’ असा निर्णय दिला आहे. त्याची जीवनशैली ही शाश्वत जीवनशैली आहे. आदिवासीच या पृथ्वीचे खरे रक्षणकर्ते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आज जी जंगल, जमीन, डोंगर आहेत, ते आदिवासींचे वास्तव्य तिथे असल्यामुळे आहे. जर आदिवासी नसते तर नैसर्गिक खनिजसंपत्ती भांडवली व्यवस्थेने गिळंकृत केली असती.

संबंधित लेख

लोकप्रिय