Tuesday, January 21, 2025

दिघी येथे आदिवासी महिलां तर्फे नागपंचमी साजरी !

दिघी : दिघी येथील वाघोबा मंदिराच्या आवारात समस्त आदिवासी महिलांच्या वतीने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या गाण्यावर फेर धरत नागपंचमी साजरी करण्यात आली. परिसरात असलेल्या वारूळाची पुजा करून गावच्या धर्तीवर जेष्ठ महिलांनी गाणी गायली. ढोल ताशीम च्या वाद्यांच्या तालावल फेर धरून ठेका धरण्यात आला. फुगडी आणि लेझीम खेळत सर्व महिलांनी सणाचा आनंद लुटला.

कार्यक्रमाचे आयोजन समस्त आदिवासी दिघीगावाच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका आशा सुपे, कुसूम गभाले, सिता किरवे, मिना मुकणे, सुंनदा सुपे, सिता शेखरे, उषा भोईर, पुष्पा ठोंगिरे, संगिता लांडे, शंकुतला भोजने, मिना वाजे, मंगल भांगरे, सविता सुपे, लता सुपे, रेश्मा गारे, सुनिता भोजने, अरूणा वाजे, मनुजा असवले इत्यादी महिला उपस्थित होत्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles