Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणपुणे : आदिवासी अधिकार मंचाचे आदिवासी विकास मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन !

पुणे : आदिवासी अधिकार मंचाचे आदिवासी विकास मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे : आदिवासी समाजातील विविध प्रश्नांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्राध्यापक भरती प्रचलित बिंदूनामावलीनुसार करा, आदिवासी संशोधकांना फेलोशिप चालू करा, आदिवासींची विशेष भरती चालू करून अधिसंख्य पदावरील बोगसांना हटवण्यात यावे व आदिवासी बांधवांना न्याय द्यावे, आदीसह मागण्या करण्यात आल्या. यावेळी सविस्तर चर्चा केली. तसेच आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द आदिवासी विकास मंत्र्यांनी दिला असल्याचे आदिवासी अधिकार मंचाचे संजय साबळे यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी अधिकार मंचाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय दाभाडे, संजय साबळे, सोमनाथ निर्मळ, स्नेहल साबळे, समीर गारे आदीसह उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय