पुणे : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिम संस्था व एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, नुकताच जागतिक आदिवासी दिन पुणे शहरात पार पडला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील, ठाकर समाजाचा, सामाजिक-आर्थिक अभ्यास आदिम संस्थेच्या वतीने मागील दोन महिन्यापूर्वी करण्यात आला होता. या अभ्यासातून समोर आलेले प्रमुख निष्कर्ष यावर चर्चा विनिमय करून पुढील दिशा ठरवण्याचे काम या कार्यक्रमात करण्यात आले.
सदरील अहवाल व त्यातील ठळक निरीक्षने याविषयी मांडणी आदीम संस्थेचे संशोधक किरण लोहकरे यांनी केली, तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छापर मनोगते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे विश्वस्त सचिव प्रा.सुभाष वारे व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे यांनी दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष ऍड.सुरेखा दळवी यांनी आदिवासी संस्कृती, ठाकर समाजाचे स्वभाववैशिष्ट्य व त्यांचे मूलभूत प्रश्न याविषयी सविस्तर मांडणी केली, ठाकर समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायद्याची मदत व संघटनशक्ती यांच्या एकत्रित मिलाफातून भिडण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.युवराज काळे, पाहुण्यांचे स्वागत, आशा लोहकरे व दत्ता मावळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हनुमंत भवारी यांनी केले व ठाकर समाजाच्या सर्वेक्षण विषयी अनुभव प्रा.स्नेहल साबळे यांनी मांडले व शेवटी आभार डॉ.अमोल वाघमारे यांनी मांडले.
आंबेगाव तालुक्यातील 13 ठाकरवस्तीतील सुमारे 298 कुटुंबाचे सर्वेक्षण करून, समोर आलेली वास्तवता ही अत्यंत विदारक आहे, त्याविषयी संस्था लवकरच अहवाल प्रकाशित करत आहे.