Pune : युनिव्हर्सल ट्राइब्स आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (DICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य आणि ऐतिहासिक सांस्कृतिक उपक्रम आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन असणाऱ्या “आदी संस्कृती महोत्सव २०२५” चे उद्घाटन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीचे संस्थापक, आय आय एम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे तसेच बारामती अग्रोच्या संचालिका व भीमथडीच्या संयोजिका सुनंदा पवार यांच्या हस्ते आज पुण्यात पार पडले. हा महोत्सव १४ मे ते १७ मे २०२५ या कालावधीत पुणे शहरात गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे (Pune) पार पडणार असून याचा पुणेकर नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
भारतातील पारंपरिक आदिवासी जीवनशैली, कला, संस्कृती, अन्न, संगीत, नृत्य आणि उद्योजकतेचे दर्शन घडवणारा एक अद्वितीय महोत्सव ठरणार आहे. या महोत्सवाचा उद्देश भारतातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाला एक नवे व्यासपीठ देणे, त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे.
विविध राज्यांतील सुमारे २० हून अधिक आदिवासी जमाती या महोत्सवात सहभागी झाले असून, त्यांच्या अनोख्या परंपरा, आस्थापन, कलेचा आणि कौशल्याचा अनुभव पुणेकर जनतेला घेता येणार आहे. २०० हून स्टॉल ५०० अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच या महोत्सवामध्ये विविध आदिवासी कलांच्या कार्यशाळा ही होणार आहेत त्याच बरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम जसे की उद्योजक्ता विकास, स्टार्ट आप मीट व काही विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune | दररोजचे कार्यक्रम आणि आकर्षणांचे तपशीलवार वर्णन:
१३ मे २०२५ – उद्घाटन सत्र :
पहिल्या दिवशी महोत्सवाची सुरुवात आदिवासी वाद्यांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषा आणि स्वागत नृत्यांच्या सादरीकरणाने होईल. या कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन हे पद्म श्री डॉ. मिलिंद कांबळे, संस्थापक अध्यक्ष डिककी यांच्या हस्ते होईल. उद्घाटन समारंभात केंद्र व राज्यस्तरीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी प्रतिनिधी, उद्योजक आणि DICCI व Universal Tribes चे पदाधिकारी उपस्थित राहतील. शेवटच्या दिवशी एकत्रित आदिवासी नृत्य-गायन स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, तसेच आदिवासी उद्योजकांसाठी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. (हेही वाचा : खळबळजनक : शाळेत तब्बल 20 फुटांचा किंग कोब्रा आढळला)
१४ मे २०२५ – हस्तकला व वनउत्पादने प्रदर्शन :
या दिवशी विविध राज्यांतील आदिवासी हस्तकला व शिल्पकलेचे प्रदर्शन होईल. बाँबूपासून तयार केलेल्या कलाकृती, ढोकरा धातुकला, गोंद चित्रकला, वारली पेंटिंग, आदिवासी शिल्प हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतील. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या विविध अन्न पदार्थाचा आस्वाद घेत येईल
या दिवशी विविध पारंपरिक आदिवासी कलांच्या कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. यात वारली चित्रकला, गोंद आणि मंडहुबणी या चित्रकालांचे समावेश असतील. सहभागी नागरिकांना या कार्यशाळांमधून प्रत्यक्ष कलेचा अनुभव घेण्याची संधी मिळेल, तसेच आदिवासी संस्कृतीच्या सौंदर्यशास्त्राचा आणि तंत्रज्ञानाचा परिचय होईल. (हेही वाचा : मोठी बातमी : 100 दहशतवादी ठार, 9 छावण्या उद्ध्वस्त; भारतीय लष्कराची माहिती)
या आंतरराष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे संयोजक श्रीमती मैत्रेयी कांबळे – राष्ट्रीय संयोजक, DICCI नेक्स्टजेन तसेच रजत रघतवान – सीईओ, युनिव्हर्सल ट्राइब्स इत्यादी सर्व उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा : ब्रेकिंग : लाडक्या बहिणींना 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार ; अजित पवार यांची मोठी घोषणा)