Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाTribal : आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Tribal : आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Tribal : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरीता आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी https://www.mahashabari.in या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत २०२४-२०२५ करीता पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांकरिता कर्जयोजना राबविण्यासाठी योजनानिहाय लक्षांक प्राप्त झालेले आहेत.

Tribal

महिला सबलीकरण योजनेकरीता २ लाख रुपये कर्जाचे २२ लक्षांक, कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज- ६, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी ५ लाख रुपये- लक्षांक ६, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्टसाठी ५ लाख रुपये कर्ज- लक्षांक ६, वाहन व्यवसायासाठी १० लाख रुपये- लक्षांक ५, वाहन व्यवसाय १० लाखाहून अधिक व १५ लाख रुपयांपर्यत – लक्षांक ८, लघु उद्योग व्यवसायासाठी ३ लाख रुपये कर्ज- लक्षांक ७, ऑटो रिक्षा,मालवाहू रिक्षा ३ लाख रुपये- लक्षांक ६, आणि स्वयंसहायता बचतगट ७ असा लक्षांक प्राप्त झालेला आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या जुन्नर शाखा कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

संबंधित लेख

लोकप्रिय