सांगोला / अतुल फसाले : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाकी (घे) ता. सांगोला येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण तसेच सेवानिवृत्त नागरिक आणि इयत्ता दहावी परीक्षेत उज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच अर्चना शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपूर्ण तालुक्यात गुरुवार दि 22 रोजी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. वाकी (घे) येथेही अजित पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्यावतीने गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व लावलेले वृक्ष कायमस्वरूपी संवर्धित करण्याचा निश्चयही यावेळी सरपंच तसेच उपस्थितांनी केला.
याबरोबरच यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इयत्ता दहावी मध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उज्ज्वल यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच अर्चना शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक दादासाहेब देवकते यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब शिंदे, गणेश कांबळे, पुण्यवंत निमंग्रे, रफिक शेख, दादासाहेब देवकते, पोलीस पाटील हालीम पाटील, ग्रा.पं सदस्य संजय लवटे, मनिषा निमंग्रे, कयूम शेख, ग्रामविकास अधिकारी वाघ यांच्यासह वाकि घेरडी परिसरातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.