Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Tree plantation : प्रदूषण कमी करण्यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब, चिंचेच्या वृक्षांचे पार शहरात असावेत – क्रांतीकुमार कडुलकर


प्रति, मा. आयुक्त, शेखर सिंह साहेब (Tree plantation)

---Advertisement---

पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी वड, पिंपळाची मोठी झाडे होती, ब्रिटिशांनी अनेक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब इ पर्यावरण पूरक आणि ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावून ती तोडण्यास मनाई करणारे कायदे केले होते. पिंपळ 100%, वड 80%, कडुलिंब 75%, चिंच 68 % झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषतात आणि परिसर शांत आणि पर्यावरण पूरक देशी झाडे लावण्याचे धोरण महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने आखावे. (Tree plantation)

परदेशी झाडे पर्यावरणास घातक असतात. प्राचीन काळापासून बहुपयोगी झाडाची पूजा केली जात आहे. वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब ई भारतीय देशी झाडे लावायची सोडुन आधुनिकतेच्या नावाखाली परदेशी कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे. ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे. (Tree plantation)

परदेशी झाडांवर कधीही पक्षी, किडे, मकोडे, भुंगे, मधमाशी, मुंग्या बसत नाहीत आणि पक्षी व जीवजंतूंची मोठी सृष्टी वृक्षांवर निवास करत असते. रस्ते विकास, रस्ते रुंदीकरण आणि जलवाहिन्या, उड्डाणपूल यांची निर्मिती करताना जुने ब्रिटिशकालीन वृक्ष सपाट करण्यात आले.

ब्रिटिशांनी भारतीय प्राचीन वटवृक्ष याची देखभाल केली होती. मुंबई पुणे महामार्गावरील 1970 ते 1990 च्या दशकात दिसणारी ब्रिटिशकालीन झाडे आता इतिहासजमा झाली आहेत. देशी झाडावर पक्षी घरटे करतात. वटवाघळे, घुबड,खारुताई, चिमण्या, कावळे, पोपट आता आसपास शहरात कुठे दिसत नाहीत. काटेरी झाडावर बहुतांश पक्षी घरटी बांधतात. ही काटेरी झाडे फक्त ग्रामीण भागात दिसतात. गाय, बैल, शेळी, माकड कधीच खात नाहीत. माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. मुक्या प्राण्यांकडून सजीव सृष्टीचे ज्ञान मुलू शकते. (Tree plantation)

जवळपास 90% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत.1970 च्या दशकात युरोपियन देशांनी षडयंत्र रचुन जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले.

---Advertisement---

तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे. आपल्या शासकीय वनीकरण कार्यक्रमात वड, पिंपळ ही देशी झाडे आजपर्यंत न लावल्यामुळे वनीकरण अपयशी ठरले. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत, त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही. शहरातील ज्या गार्डनमधे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे. इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत. ज्या झाडावर पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे. वड, पिंपळ, पळस ही झाडे ज्या भागात आहेत तेथे हवा शुद्ध असते. (Tree plantation)

पिंपरी चिंचवड शहरातील हवा आता अशुद्ध झाली आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व जनतेला आणि सरकारला कळले आहे. औद्योगिक विकास, शहरीकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील अनेक जुन्या वृक्षांना अडथळा समजून तोडुन टाकण्यात आले, त्यावेळी काही संवेदनशील लोकांनी आंदोलने केली होती. शहर हिरवे गार करण्यासाठी मनपाच्या वृक्ष सवर्धन आणि पर्यावरण खात्याने आधुनिक शोभिवंत आणि भरपूर पाणी शोषणारी झाडे लावून शहर हिरवे केले आहे, परंतु शहरातील प्रदूषण कमी झाले नाही.गेल्या 60 वर्षात जलसंवर्धक, पर्यावरणपूरक वृक्ष लावू नयेत असेच सरकार धोरण आहे. भारतीय परंपरेतील प्राचीन झाडे पशु, पक्षी, जीवजंतूंची आश्रयस्थाने आहेत, तसेच या झाडांमुळे भूजल पातळी वाढते. मात्र अलीकडच्या काळात शोभिवंत निलगिरी सारखी झाडे रस्याच्या कडेला लावली जातात. ती झाडे पर्यावरणासाठी उपयुक्त नसतात. (Tree plantation)

इस्रायल, चीन, व्हिएतनाम सारख्या नवस्वतंत्र आणि अलीकडच्या चार दशकात विकसित झालेल्या राष्ट्रांनी शोभिवंत झाडाऐवजी भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे लावली आहेत. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी हजारो हात शहरात पुढे येतात, मात्र मनपा प्रशासनाकडे पर्यावरण दृष्टिकोन नाही, कोणती झाडे लावावीत यासाठी ज्ञानवंत अधिकारी नाहीत. त्यामुळे शहरातील वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब सपाट करण्यात आले आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागात या झाडासाठी आरक्षित जमीन करावी आणि तेथे हे प्राचीन आणि पवित्र वृक्ष लावावेत, शहरात वड, पिंपळ पार पुन्हा उभारावेत.

भारतात व जगात सर्वत्र वृक्षपूजेला अतिशय महत्व आहे.या मागील सकारात्मकधार्मिक भावनांमुळेच वड, पिंपळ, उंबर, बेल ई झाडांचं अस्तित्व आणि त्यांचा माणसाशी असलेला संबंध पिढ्यानपिढ्या टिकून राहिला आहे.पिंपरी चिंचवड शहराला हिरवाईचे निसर्गरम्य रूप येण्यासाठी महावृक्ष लावावेत. त्यामुळे औद्योगिकरण, नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संतुलन राहील. शहरात माणसांची लोकसंख्या वाढत असताना पशुपक्षी, किडे, मकोडे, जीवजंतुना पण निवासासाठी जागा मिळेल आणि स्मार्ट सिटी पर्यावरणीय दृष्ट्या अधिक स्मार्ट होईल.

क्रांतीकुमार कडुलकर, पत्रकार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles