Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये वृक्षारोपण समारंभ संपन्न

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात येणार आह़े. 

---Advertisement---

शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये वृक्षारोपण समारंभ, काव्यलेखन स्पर्धा, रक्तदान शिबिर, निबंधलेखन स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आह़े. आज उपक्रमाच्या पहिल्या दिवशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत वृक्षारोपण समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ.किशोर काकडे उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण करून मानवी जीवनातील वृक्षांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे यांनी केले. 

---Advertisement---

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय जड़े, डॉ.शहाजी करांडे, डॉ.एकनाथ मुंढे, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ.रंजना जाधव, प्रा. अजित जाधव, शेखर परदेशी, प्रा.गजानन घोडके, डॉ.अतुल चौरे आणि वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles