Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राज्यातील सात सनदी अधिकऱ्यांंच्या बदल्या

---Advertisement---

मुंबई : राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांची पुण्यात आदिवासी संशोधन संस्थेवर बदली करण्यात आली आहे. तर नागपूरच्या अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा खत्री यांना नंदुरबार जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे . नागपूरच्या पालिका अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आता धुळे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .

---Advertisement---

■ राज्यात ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या (कंसात नव्या नियुक्तीचे ठिकाण)

1. व्ही . बी . पाटील, IAS ( MH : 2000 ) सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय ( विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई)

2. विजय विजय वाघमारे, IAS ( 2004 ) सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई (सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , मंत्रालय)

3. श्रीमती विमला आर., IAS ( 2009 ) (जिल्हाधिकारी, नागपूर)

4. लक्ष्मीनारायण मिश्रा, IAS ( 2012 ) जिल्हाधिकारी, रत्नागिरी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेड)

5. डॉ. राजेंद्र भारुड, IAS ( 2013 ) जिल्हाधिकारी, नंदुरबार (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे)

---Advertisement---

● जलज शर्मा, IAS ( 2014 ) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका (जिल्हाधिकारी, धुळे).

● श्रीमती मनीषा खत्री, IAS ( 2014 ) अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर (जिल्हाधिकारी, नंदुरबार )

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles