Thursday, January 23, 2025

नारायणगावला पोलिस निरीक्षक दर्जा ? नारायणगाव पोलिस ठाण्याला नवे पोलीस निरिक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील ३३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे / रवींद्र कोल्हे : प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदत वाढ देऊन व पोलिस अधिकारी वर्गाचा सन्मान राखून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिह्यात मोठे फेर बदल केले आहेत. एकाच पोलिस ठाण्यात दोन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अकरा पोलिस अधिकारी आणि तेहत्तीस पोलिस निरीक्षक तसेच सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. नारायणगाव पोलिस ठाण्यात या पूर्वी सहायक पोलिस निरीक्षक ही जागा होती.आता या पुढे पोलीस निरीक्षक म्हणून नियंत्रण कक्षातून विलास देशपांडे याची बदली नारायणगाव पोलिस झाली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे कंसात नव्याने बदलीचे ठिकाण

१) संदीप येळे : रांजणगाव (स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB)

२) राहुल घुगे : सासवड  (बारामती तालुका)

३)जीवन माने : भिगवण (घोडेगाव)

४) दिलीप पवार : वालचंद नगर(भिगवण)

५) बिराप्पा लातुरे : इंदापूर (वालचंद नगर)

६) नवनाथ रानगट : शिक्रापूर (आळेफाटा)

७) प्रमोद पोरे : बारामती तालुका (बारामती शहर)

पोलिस निरीक्षक आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे कंसात नव्याने बदलीचे ठिकाण

१) विलास देशपांडे : नियंत्रण कक्ष (नारायणगाव)

२) टी.वाय.मुजावर : लोणावळा ग्रामीण (इंदापूर)

३) नारायण पवार : दौंड, यवत

४) अशोक शेळके : जिल्हा विशेष शाखा (स्थानिक गुन्हे शाखा(LCB)

५)विठ्ठल दबडे : आर्थिक गन्हे अन्वेषण(LCB) भोर पोलिस ठाणे

६) विनोद घुगे : नियंत्रण कक्ष ( दौंड)

७) भगवंत मांडगे : नियंत्रण कक्ष(रांजणगाव)

८) सुरेशकुमार राऊत : रांजणगाव(शिरूर)

९)प्रवीण मोरे : नियंत्रण कक्ष (लोणावळा ग्रामीण)

१०) पद्माकर घनवट : स्थानिक गुन्हे अन्वेषण(LCB) आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग)

११) प्रवीण खानापुरे : शिरूर (नियंत्रण कक्ष)

पोलिस उपनिरीक्षक आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे कंसात बदली झालेले ठिकाण 

१) सतीश डोले : आळेफाटा (घोडेगाव)

२) राजेंद्र पवार : भोर (आळेफाटा)

३) प्रकाश खरात : दौंड (बारामती)

४)बाळू पवार : वाचक खेड विभाग (नियंत्रण कक्ष )

५) सुरेखा शिंदे : कामशेत (लोणावळा शहर)

६) सागर खबाले : मंचर (सायबर विभाग)

७) संजय धोत्रे – इंदापूर (वाचक खेड विभाग)

८) प्रियांका माने : लोणावळा शहर ( यवत )

९) सुनील मोटे : शिरूर (वेल्हा पो.ठाणे) 

प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदत वाढ दिली आहे.

मुदतवाढ दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे पोलिस निरीक्षक  

१) अशोक धुमाळ : पौड (मुदतवाढ)

२) भाऊसाहेब पाटील : यवत (मुदतवाढ)

सहायक पोलिस निरीक्षक (मुदतवाढ) १)ऋषीकेश अधिकारी – दौंड (मुदतवाढ)

पोलिस उपनिरीक्षक (मुदतवाढ) १) शामराव मदने – वाचक-भोर विभाग(मुदतवाढ), २)दिलीप देसाई — वडगांव  मावळ

(मुदतवाढ) 

प्रशासकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यात पोलिस निरीक्षक दोन,सहायक पोलिस निरीक्षक एक आणि उपनिरीक्षक दोन असे एकूण पाच अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवेसाठी मुदतवाढ मिळाली आहे. तर पोलिस उपनिरीक्षक नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक म्हणून आठ अधिकारी तर पीआय म्हणून अकरा पोलिस अशा तेहत्तीस पोलिस अधिकऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles