Thursday, July 18, 2024
Homeकृषीशाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथील प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र ऍग्रो बारामती येथे...

शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथील प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र ऍग्रो बारामती येथे भेट !

शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे स्थित एग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस सेंटर तर्फे घेतला जाणारा 45 दिवसांचा रहिवासी प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगास प्रकल्प भेट कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी शाश्वत शेतीचे दत्तात्रय जाधव सर,अतुल खुडे सर आणि तीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.यादरम्यान विद्यार्थ्यांना फळे व भाजीपाला निर्जलीकरण dehydration, हरभरा डाळी पासून बेसन उत्पादन प्रक्रिया, मार्केटिंग इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र ॲग्रो चे युवा उद्योजक जुनेद आत्तार प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले,” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उद्योग जगताकडे वाढण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे महाराष्ट्र ऍग्रो च्या माध्यमातून त्यांना स्वयंपूर्ण प्रशिक्षण तसेच प्रक्रिया ते मार्केटिंग पर्यंतचे संपूर्ण ज्ञान प्रदान केले जाते.केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगातील विविध योजनांचा अभ्यास व त्यातून मिळणारे अनुदान या सर्व तांत्रिक बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यांना पुढील उद्योग उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले”.

यावेळी श्रमण फूडचे युवा उद्योजक रोहन थोरात यांनी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या मशिनरी विषय तांत्रिक माहिती दिली.तसेच युवा उद्योजक रत्नदीप सरोदे यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय