Friday, March 29, 2024
Homeजिल्हापुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळे बंद - जमावबंदीचा आदेश जारी

पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळे बंद – जमावबंदीचा आदेश जारी

पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळी जिल्हाधिकारी ठिकाणांपासून एक किलोमीटर डॉ.राजेश देशमुख यांनी बंदी हुकूम जारी केला आहे. परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

या आदेशाची कडक अंमलबजावणी ८ जानेवारीपासून पोलिसांनी सुरू केली आहे. मनोरंजन उद्याने, प्राणिसंग्रहालय, वस्तू संग्रहालये, किल्ले, सशुल्क ठिकाणे आणि कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

हेही वाचा ! विकत घेणारे तयार आहेत, विकत देणारे सत्तेत आहेत; त्यामुळे खाजगीकरण मूळावर आले – अ‍ॅड. मोहन वाडेकर

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मावळ – भुशी धरण, घुबड तलाव, लोणावळा धरण, तुंगाली धरण, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन पूल, वलवण धरण, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिविलग पॉइंट कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि पवना धरण परिसर

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

मुळशी – लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर.

हवेली – घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर.

आंबेगाव – डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.

जुन्नर – शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र

हेही वाचा ! पुणे : उद्यापासून किसान सभेचे जुन्नर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

भोर – रोहिडेश्वर गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.

वेल्हा – तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर 

या ठिकाणी तसेच जिल्ह्यात सर्वत्र जमावबंदी संचारबंदी नियम उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

हेही वाचा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय