Tuesday, April 23, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात सकाळीच पर्यटकांची गर्दी

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात सकाळीच पर्यटकांची गर्दी

जुन्नर : जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १४४ लागू करूनही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील पर्यटनस्थळी १६ जुलै पासून  कलम १४४ लागू करण्यात आलेला आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करून देखील पर्यटन गर्दी करताना दिसत आहे. नाणेघाट परिसरात आज सकाळीच पर्यटकांनी गर्दी केलेली दिसली, तसेच अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

जुन्नर तालुक्यातील नाणेघाट, दाऱ्याघाट, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र, शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहे.

अधिक वाचा :

जुन्नर : पर्यटनाला बंदी, नवा आदेश जारी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय