Saturday, March 15, 2025

आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या टॉप फाईव्ह बातम्या

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now


१. 10 वी ची मार्कशीट चे 17 ऑगस्ट पासून वाटप

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वी ची मार्कशीट 17 ऑगस्ट पासून देण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे मार्कशीट विद्यार्थ्यांना ठराविक दिवशीच घेऊन जाण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करू नये, अशीही सूचना शाळांना दिली गेली आहे. शाळांनी गर्दी होऊ नये याची काळजी घेऊन हे वाटप करायचे आहे.


२. राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे

     राज्यसेवा पूर्वपरीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढे ढकलली आहे जी पूर्वी 13 सप्टेंबर ला आयोजित केली होती. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 20 सप्टेंबर ला होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा कारण म्हणजे 13 सप्टेंबर ला वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा नीट (NEET) घेणार जाणार आहे. 

३. 130 लोकांमधून माझी निवड- नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू

        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर राजकीय संबंधांमुळे कुलगुरूपद मिळाल्याचा आरोप केला जात आहे.  यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तरात म्हटले आहे.  कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया तीन टप्प्यात गुणवत्तेच्या आधारे केली जाते असे ही ते म्हणाले. जेथे त्याची निवड 130 पैकी टॉप 30 उमेदवारांमध्ये झाली. यानंतर समितीतर्फे मुलाखत घेण्यात आली आणि पहिल्या 5 मध्ये त्यांची निवड झाली आणि शेवटी राज्यपालांचा मुलाखतीद्वारे निवड झाली.  या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षण मंचाच्या हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  या अगोदर नागपूर विद्यापीठाचे पर-कुलगुरू म्हणून निवड झाली होती, त्यात कुणालाही आक्षेप नव्हता.

 ४. जर विद्यापीठ परीक्षा घेत असतील तर ते काही मनमानी करीत नाहीत – केंद्रीय मनुष्यबळ मंत्री

     युजीसीने सर्व विद्यापीठांना सप्टेंबर च्या शेवटीपर्यंत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे निर्देश आधीच दिले आहेत. तसेच सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या सोयीची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी सांगितले की,

 विद्यापीठे अंतिम वर्षाची परीक्षा घेत असतील तर त्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचे मनमानी कार्य करत नाहीत. यर त्यांना तसे परीक्षा घेण्यास निर्देश दिले आहे.

५. पीस मोशन ग्राफिक्स स्पर्धा

     सुन्हक पीस फाउंडेशनतर्फे मोशन ग्राफिक्स व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  यात आफ्रिकेचा विकास, हवामान बदल, अन्न सुरक्षा, धार्मिक समरसता, लिंगभेद आणि निर्वासित शिक्षणाची थीम निश्चित केली आहे.

 त्यामध्ये भाग घेण्यासाठी व्हिडिओ स्वतः तयार करवा लागणार आहे.  यात बैकग्राउंड साउंड, म्यूजिक आणि वॉइस ओवर चा उपयोग देखील करता येणार आहे.  व्हिडिओ लांबीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत. विजेत्यास अंदाजे 3,74, 000 एवढी रक्कम देण्यात येईल.  उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या 3 एंट्रीइस मधील प्रत्येकाला 74,000  रुपये देण्यात येणार आहेत.  20 उपविजेत्याला 22,400 रुपये मिळतील.  आपण 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता.  अधिक माहितीसाठी Https://callforart.net/2020-peace-motion-graphics-competation या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles