Friday, April 19, 2024
Homeकृषीटोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !

टोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !

 पुणे : एकीकडे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असता टोमॅटोने मात्र त्यांचा मान राखला आहे टोमॅटोचा भाव शंभरी पार गेला आहे घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाली आहे.टोमॅटो लागवडीत घट झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत.

टोमॅटोची लागवड पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर केली जाते; परंतु उन्हाळय़ामुळे टोमॅटोची लागवड कमी झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत.

केटिरग व्यावसायिक तसेच हॉटेलचालकांकडून टोमॅटोला चांगली मागणी आहे. बाजारात टोमॅटोची आवक कमी होत असल्याने गेल्या १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सध्या किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये किलो दराने केली जात आहे.

लाल महालात लावणी करणे पडले महागात ; वैष्णवी पाटील ने मागितली जाहीर माफी !

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी, आजच करा अर्ज !

विशेष लेख : जागतिक जैव विविधता दिवस !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय