Saturday, October 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआजपासून राज्यात धावणार इलेक्ट्रिक एसटी बस !

आजपासून राज्यात धावणार इलेक्ट्रिक एसटी बस !

 पुणे : राज्यातील महापालिकांची परिवहन सेवा आणि एस.टी. महामंडळ यांच्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा शुभारंभ 1 जूनपासून होत आहे. राज्यातील 8 महापालिका आणि एस.टी महामंडळ यांनी एक हजार इलेक्ट्रिक बसेसची मागणी नोंदविली आहे. त्यातील 20 टक्केच बसेस उपलब्ध झाल्या आहेत. पुढील 4 महिन्यांत उर्वरित बसेस उपलब्ध होतील. नगर-पुणे या मार्गावर पहिली ई-बस धावणार असून, एकूणच ई-बस सेवेचा शुभारंभ होणार आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे जागतिक पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. त्यामुळे प्रदूषण करणार्‍या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक पावले उचलत आहेत.

राज्यातील महापालिका व एस.टी. महामंडळ परिवहन सेवेत सन 2022 च्या अखेरपर्यंत 1 हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वित्त आयोगातून तीन हजार कोटींचे अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 1 जून रोजी इलेक्ट्रिक बस पुणे ते नगर या मार्गावर प्रथमतः सुरू होत आहे. पर्यावरण रक्षणाच्या द़ृष्टिकोनातून हे प्रथम पाऊल परिवर्तनाची नांदी ठरणार, असा विश्वास पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य : पहिल्यांदा सेक्स करताना या 8 गोष्टी ठरतील लाभदायक !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात 517 पदांसाठी भरती, 1 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

टाटा आयपीएल (Tata IPL) खरंच फ्रि रिचार्ज देत आहे का? वाचा सत्य !

संबंधित लेख

लोकप्रिय