विशेष : आपल्या प्रयोगशील संगीतानं कोट्यवधी कानसेनांच्या हृदयावर राज्य करणारा विश्वविख्यात संगीतकार व गायक एआर रहमान याचा ६ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. सांगितीक कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्यामुळंही तो कायम चर्चेत असतो.

एआर रहमानचा जन्म ६ जानेवारी १९६६ साली चेन्नईमध्ये झाला. त्याचे खरे नाव दिलीप कुमार असे होते. रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तमिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे. पण रेहमान नऊ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घर चालवण्यासाठी रेहमान वाद्ये भाड्याने देऊ लागला. काही दिवसांनी त्यांच्या आईने हा व्यवसाय सांभाळला आणि रेहमान यांना कामाचे स्वातंत्र्य दिले. रेहमानच्या पत्नीचे नाव सायरा बानो असे आहे. तर रेहमानचे मूळ नाव दिलीप कुमार. त्यांच्या नावाबाबत योगायोग म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नीचे नावही सायरा बानो आहे.

ए. आर. रहमानची प्रतिभा सर्वांनाचा माहीत आहे. त्यांनी अनेक सुमधुर गाणी तर दिली पण 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना ऑस्करही मिळाला. तसेच गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कारांवरही त्यांनी नाव कोरले. रहमानचे परदेशातही अनेक चाहते आहेत. परदेशातील रस्त्यांना त्यांचं नाव दे ए. आर. रहमान यांना गौरवण्यातही आलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र जनभूमीतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.
संकलन रत्नदीप सरोदे