Tuesday, April 23, 2024
Homeकृषीतिवसा : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या - DYFI ची मागणी

तिवसा : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – DYFI ची मागणी

तिवसा : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या, पीक विमा मंजुर करा, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तिवसा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावर्षी खरीप हंगाम सुरू असताना गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीन, तुर, कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. तसेच तालुक्यात संत्रा बागाईतदार सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. काही शेतकरी भाजीपाला उत्पादक सुद्धा आहेत. गेल्या तीन चार वर्षातल्या सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या चांगल्या उत्पादनाच्या खूप अपेक्षा होत्या. परंतु सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हाती आलेला घास हिरावून घेतला आहे. सोयाबीन पीक काढणीला आले तरी अजूनही बऱ्याच शेतात पाणी साचून आहे. काढणीला विलंब होत असल्याने पीक सडत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक पुर व अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. 

म्हणून तिवसा तालुक्यातील संपूर्ण शेतीक्षेत्राचा शासनस्तरावर ताबडतोब पंचनामा करून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच यावर्षीचा पीक विमा मंजूर करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अन्यथा 15 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी संघटनेचे अंकुश वाघ, अभिजित भेलकर, रोशन कांडलकर, संतोष निमकर, सुधाकर वऱ्हाडे, प्रफुल निकाळजे, तज्ञील सांभारे, प्रदीप सुरजूसे, सतीश केवदे, विलास भोयर, चेतन कांडलकर आदी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय