Tuesday, March 18, 2025

तहानलेले लातूर, पाण्याच्या प्रतीक्षेत आठवड्यातून दोनदा पाणी !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

लातूर : विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेच्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाने लातूर शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल अशी घोषणा केली होती.त्याला दोन दशके उलटून गेली. २४ तास तर सोडा आठवडय़ातून एक वेळेसदेखील वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने लातूर शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणातील पाणीसाठा संपून धरण कोरडेठाक पडल्याने २०१५-१६साली लातूर शहरवासीयांना रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. इतक्या दीर्घकाळ एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. त्यानंतर पाऊस झाला व धरणात पाणी आले. गेली पाच वर्षे धरणातील पाणीसाठय़ात अडचण नाही ,लातूर शहरवासीयांना मात्र धरणात पाणी असो अथवा नसो पाण्याची अडचण कायम आहे.

लातूरकरांना पिण्यासाठी आठवडय़ातून एक वेळा देखील शुद्ध पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित देशमुख यांनी लातूरवासीयांना दोन महिन्यांत उजनीचे पाणी पुरवले जाईल, शहरवासीयांनी नळाच्या तोटय़ा सज्ज ठेवा अन्यथा पाणी वाया जाईल असे सांगितले होते. अडीच वर्षे उलटली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. उजनीचे पाणी सोडा धनेगाव धरणाचे पाणीदेखील लातूरवासीयांना वेळेवर दिले जात नाही याबद्दल लातूरकर संतप्त आहेत.

SC – OBC विद्यार्थ्यांना अभ्यास करून महिना 4000 रूपये कमावण्याची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा

पदवीधर उमेदवारांसाठी खूशखबर ! पुण्यात विविध रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची अंतिम तारीख

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles