Sunday, July 14, 2024
Homeजिल्हाजेजुरीत हजारो भाविक दाखल, वाहतूक कोंडीने भाविकांसह प्रवासीही हैराण

जेजुरीत हजारो भाविक दाखल, वाहतूक कोंडीने भाविकांसह प्रवासीही हैराण

जेजुरी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंडेरायाच्या यात्रेनिमित्त आज लाखो भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत. दोन वर्षांनी होत असलेल्या या यात्रेमुळे जेजुरी गडाच्या पायथ्याशी शेकडो वाहने, एसटी बसेस, खाजगी गाड्यांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सांगोला, आटपाडी, माण, सातारा आगारच्या एसटी बसेस या ट्राफिक कोंडीत अडकल्या. मुंबई, नाशिककडे निघालेले शेकडो चाकरमानी आणि त्याचा खाजगी गाड्यातील प्रवासी भर कडक उन्हाळ्यात कोंडीत सापडल्याने हैरान झाले आहेत. ऐनवेळी पुरेसा बंदोबस्त नसल्याने वाहतूक कोंडी होऊनही वेळेत रस्ता खुला झाला नाही आणि प्रवाशांचे हाल झाले.

त्यामुळे जेजुरी मध्ये यावर्षी भाविक मोठ्या प्रमाणात येणार हे माहीत असूनही पोलिसांच्या वाहतूक शाखेने पूर्वतयारी केली नाही का असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत.

प्रतिनिधी – सोनाली डावरे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय