पुणे : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवस झाली सांगली , कोल्हापूर या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्यांदा पाऊस अरबी समुद्रात दाखल झाला. तेथुन काही ठिकाणी पाऊस कोसळला पण पुन्हा त्याने विश्रांती घेतली असल्याचं समोर आलं आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन 2 दिवसांनी लांबणीवर गेले आहे. आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं आहे.
Wet spell over Northwest India and Madhya Pradesh on 23rd May and decrease in intensity & distribution thereafter.
Isolated Thundersquall (50-60 kmph) activity also very likely over Uttarakhand, Punjab, Haryana-Chandigarh-Delhi, Uttar Pradesh and East Rajasthan today. pic.twitter.com/bQJSjktKAz— India Meteorological Department (@Indiametdept) May 23, 2022
दरम्यान, याअगोदर मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सध्या त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचे दिसत आहे. 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. तसेच, आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात 3 ते 9 जूनमध्ये तो धडकणार आहे. 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे.
देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !
भूल भुलैया 2 चित्रपटाचा जलवा ; कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला !