Sunday, March 16, 2025

महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार” प्रकाश आंबेडकर

मुंबई : राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधान माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे.१५ दिवस वाट पाहा, मग काय होते ते कळेल असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकीय वर्तुळातील चर्चेवर भाष्य केले आहे. त्यामुळे नेमकं राज्यात काय घडणार? अजित पवार काय निर्णय घेणार? याबाबत विविध चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया. २ ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणारच आहेत असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत पत्रकारांनी राज्यातील सरकार कोसळणार का असं विचारले असता १५ दिवसांची वाट पाहा सर्व काही समजेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे १५ दिवसांनी राज्यात काय होणार असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles