चंदीगड : हरियाणात आलेल्या पुरामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. चीका परिसरातील भाटिया गावात घग्गर नदीचा बंधारा फुटल्याने गावात पाणी तुंबले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आमदाराच्या कानशिलात एका महिलेने लगावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैथल येथील घग्गर नदीवरील बंधारा फुटला आहे. यामुळे चीका परिसरातील काही गावे पाण्याखाली गेली आहेत. याच पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार ईश्वर सिंह गुहला गावात आले होते. यावेळी एका महिलेनं आमदाराच्या कानशिलात लगावली. ईश्वर सिंह असे या आमदाराचे नाव आहे.
गुहला विधानसभा मतदारसंघातील जेजेपी पक्षाचे आमदार ईश्वर सिंह पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी लोकांनी आमदाराला जाब विचारला की, पाच वर्षे कुठे होतास व आता कशासाठी आला आहेस, असे म्हणत एका महिलेने थेट सर्वांसमोर आमदाराच्या कानशिलात लगावली. त्यावेळी लोकांनी आमदाराला धक्काबुक्कीही केली. आमदाराच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हरियाणाच्या कैथलमधील चीका परिसरात घग्गर नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 40 गावांमध्ये पुराचा धोका असून अनेक गावांतील लोकं पुरात वाहून गेली आहे. बुधवारी संध्याकाळी घग्गर धरणातील पाणी पंजाब सीमेवरील भाटिया गावात पोहोचले. गुहलाचे जेजेपी आमदार ईश्वर सिंह भाटिया गावात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी विरोध केला.
जेजेपी हा हरियाणामधील भाजप सरकारमधील सहयोगी पक्ष आहे. सत्ताधारी पक्षातील आमदाराला महिलेनं कानशिलात लगावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्यक्षचं वक्तव्य
मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय
खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या
ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात
टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार
ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात
अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी