Thursday, January 23, 2025

सकाळीच “या” ठिकाणी जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

                                        

उत्तराखंड, दि.११ : आज सकाळी उत्तराखंड भूंकपाच्या धक्क्याने हादरले आहे. उत्तराखंडमधील जोशीमठ पासून सुमारे ३१ किलोमीटर अंतरावर सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे झटके जाणवताच नागरिकांना घराबाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या धक्क्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती येत आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर इतकी होती. उत्तराखंडच्या जोशीमठपासून ३१ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) मध्ये आज पहाटे ५.५८ वाजता हा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. 

उत्तराखंडमधील चमोली, पौडी, अल्मोडा या जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. तसेच शेजारील राज्यांना देखील हलक्या स्वरूपाचे धक्के बसल्याची माहिती आहे. मात्र या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी, ऑगस्टमध्ये उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये ३.८ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles