Saturday, March 15, 2025

पोटचा मुलगा दिला भावाला अन् भावाच्या लेकीला घेतलं ‘दत्तक’; ऐतिहासिक निर्णयाचं सर्वत्र कौतुक

जन्माला येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तरीसुध्दा मुलाच्या हव्यासापायी सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केल्या जातो.आणि मुलीचा गर्भ असेल तर तो पाडला जातो.

काही प्रमाणात अवैध गर्भपात गर्भलिंग चाचणी झाल्याच्या तक्रारी शासनाकडं प्राप्त आहेत. त्यामुळंच कदाचित मुलींच्या संख्येत घट होत असल्याचं वास्तव नाकारता येत नाही.

मुलगी झाली म्हणून तिला रस्त्यावर सोडायचं, मुलीचा पोटातच गर्भपात करायचा, वंशाला दिवा पाहिजे अशीच इच्छा ठेवायची अशा बातम्या नेहमीच ऐकायला मिळत असतात. मात्र, सांगलीमधील जत तालुक्यातील शेगावमध्ये चक्क आपल्या लहान मुलाला दत्तक देऊन मुलगी दत्तक घेण्याचा प्रकार घडलाय.

या मुलीचा नामकरण सोहळाही अगदी दिमाखात साजरा झाला. आता या अनोख्या दत्तक प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. शेगावातील सुखदेव माने यांच्या कुटुंबातील दोघा सख्ख्या भावंडांनी जगासमोर एक नवा ‘आदर्श’ ठेवला आहे.

बिरुदेव सुखदेव माने आणि त्यांचा लहान भाऊ आप्पासोा सुखदेव माने हे आपल्या आई-वडिलांसमवेत एकत्र कुटुंबातच राहतात. बिरुदेव माने यांना एक मुलगा होता तर सुखदेव माने याला एक मुलगी. दोन्ही भावांना काही महिन्यांच्या अंतरानं पुन्हा दोन मुलं झाली, ज्यामध्ये मोठा भाऊ बिरूदेव माने याला पुन्हा मुलगा तर लहान भाऊ अप्पासोा माने याला पुन्हा दुसरी मुलगी झाली.

आप्पासोा माने यांना मुलगा हवा होता, तर बिरुदेव माने यांना मुलगी हवी होती. या दोघा भावांनी मग आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी घरच्यांशी विचार विनिमय करून आपल्या मुलांना एकमेकांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या भावाला लहान भावानं आपली मुलगी द्यायची आणि त्या बदल्यात मोठ्या भावानं लहान भावाला मुलगा दत्तक द्यायचं ठरलं.

यासाठी दोघा भावंडांनी नामकरण सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाचं सगळ्या गावाला निमंत्रण दिलं. लहान भावानं आपली 2 महिन्याची मुलगी अन्विता ही मोठ्या भावाला तर मोठ्या भावानं आपला 2 वर्षाचा मुलगा आरुष हा लहान भावाला दत्तक दिला. मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. दत्तक पुत्र आणि दत्तकपुत्रीच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया देखील दोघा भावांनी पूर्ण केलीये. या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles