बनपुरी (अंकुश मुढे) : चराऊ कुरणं मेंढपाळांना मुक्त करून चराऊ कुरणांचा आटपाडी पॅटर्न महाराष्ट्रभर लागू करण्याची मागणी मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने आटपाडी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
मेंढपाळांना महाराष्ट्र भर वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तसेच महाराष्ट्रातील मेंढपाळ हा भटकंती करत आपली उपजीविका करत असल्याने, भटकंतीमध्ये अनेक हाल अपेष्ठांना तोंड द्यावे लागते. त्यांना शासनाकडून कोणतीच योजना मिळत नसल्याची खंत मेंढपाळ पुत्रांनी बोलुन दाखिवली. आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणुन मेंढपाळांकडे पाहिले जाते. परंतु आज कणाच नेस्तनाबूत होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील सर्व कुरणे व गायराण विकसित आणि मुक्त करून मेंढपाळांच्या नावे ७/१२ करावेत, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळांमधून सुरक्षा कवच देण्यात यावे, सुरक्षा किटमध्ये मेंढर कातरायची मशिन,फोल्ड करायचा तंबु, कुर्हाड, घोंगडी, टाॅर्च लाईट, मेंढ्या पाठीमागे वापरायच्या चपल्या बंदुक या गोष्टीचा सामावेश करावा, महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मेंढ्या आडरानात आजारी पडल्यास दवाखाना उपलब्ध नसतो तर यासाठी पशु अलब्युल्स सुरू करावी, महाराष्ट्रातील मेंढपाळांना फिरते रेशनकार्ड देण्यात यावे, मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्यास शासनाने मेंढ्याचे पंचनामे करून मेंढपाळांना मेंढ्याचा विमा देण्यात यावा किंवा महामंडळातुन मेंढ्या देण्यात यावा, महाराष्ट्रातील मेंढपाळांचा मेंढ्यांच्या मागे मृत्यू झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळातुन त्या मेंढपाळाला मेंढपाळ नेते कै बबनराव थोरात यांच्या नावाने पाच लाख रुपये देऊन विशेष अर्थ सहाय्य करावे, महाराष्ट्रातील मेंढपाळ वर्ष भर भटकंती करणारा समुदाय आहे, त्यांची मुलं शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत कारण वसतिगृहात त्यांना जागा खुप कमी असतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळांच्या मुलांना स्वतंत्र वसतीगृह करावे व मेंढपाळांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना घर बांधण्यासाठी शासनाकडून जमिन देऊन त्यांच्यासाठी अहिल्यादेवी होळकर घरकुल आवास योजनेंतर्गत घरे बांधून द्यावीत,
महाराष्ट्रातील मेंढपाळांच्यावर हिंसक पशु गावगुंड हल्ले करतात त्यापासून संरक्षण करण्यासाठी बंदूक देण्यात यावी, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता त्यांच्यासाठी अँँट्राॅसिटी पेक्षा कडक कायदा करण्यात यावा, महाराष्ट्रातील मेंढपाळांची लोकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाने विकत घेऊन मेंढपाळांच्या लोकरीला प्रोत्साहन देण्यात यावे, मेंढपाळांची पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करुन घेतात. ती थांबविण्यासाठी मेंढपाळांच्या मेंढ्यांंचा सर्वे करू मेंढ्यांच्या कळपावरती जाऊन मेंढ्यांना मोफत वैद्यकीय औषधे देण्यात यावीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाला महाराष्ट्र शासनाने त्वरित निधी द्यावा, मेंढपाळांच्या मेंढ्यांना हमीभाव द्यावा.
दुष्काळसदृश्य भागात मेंढपाळांना शासनाने महामंडळाच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू कराव्यात, महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या कलेला वाव देऊन गजीनृत्य/गजीढोल कैपत्ये धनगरी ओव्या सादर करणार्या कलाकरांना शासकीय मानधन देण्यात यावे, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना मेंढ्या खरेदी करण्यासाठी २० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, गेली ६० वर्ष डुबई कुरणांमध्ये असलेल्या ओढ्यात मेंढ्या पाणी पितात डूबई ओढ्यासह आटपाडी तालुक्यात कुठेही मुक्या जनावरांना पाणी पिण्यास बंधन नसावं, आटपाडी तालुक्यासह महाराष्ट्रभर कुरणे, फाॅरेस्ट इतर शासकीय जमिनीमध्ये ५ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यास बंधन असु नये, इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी मेंढपाळ पुत्र आर्मी चे संयोजक अर्जुन थोरात, दत्तात्रय यमगर, नाथा पावणे, नाना पावणे, बिरा सोन्नुर, नवनाथ गारळे इत्यादीसह मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.