Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राज्यसभेतील विजयाची घोडदौड महापालिका निवडणुकीत कायम राहणार : अमोल थोरात

---Advertisement---

---Advertisement---

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन

पिंपरी चिंचवड : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला अक्षरश: धूळ चारली. ही विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही कायम राहील, असा विश्वास भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी व्यक्त केला.

राज्यसभेच्या राज्यातील ६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपाकडून अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडीक विजयी झाले आहे. ६ व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार संजय पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र, भाजपाने तीनही जागा जिंकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अमोल थोरात म्हणाले की, भाजपाची विधानसभेत १०६ मते असताना भाजपाने ६ व्या जागेसाठी उमेदवार दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीची ९ मते भाजपाच्या उमेदवाराला मिळाली. धनंजय महाडीक यांना शिवसेना उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, हा महाविकास आघाडीचा मोठा पराभव आहे.

तसेच, आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: हा भाजपाचा विचार आमदारांनी आपल्या कृतीतून सिद्ध करुन दाखवला. आमदार जगताप यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांना आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन

पिंपरी-चिंचवड शहरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. बूथ सक्षमीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या विविध योजना व विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील विजयाची घोडदौड पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही पहायला मिळणार आहे, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

---Advertisement---

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 104 पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 20 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles