Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

रक्षकच बनला भक्षक ! वसतीगृहाच्या काळजीवाहकाकडून 5 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडकी गावात मुलींच्या वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वसतीगृहातील मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

---Advertisement---

या प्रकाराबाबत बुधवारी स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणारी त्याची पत्नी जी वसतीगृहाच्या अधीक्षका आहे यांच्यासह सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आहे. तर पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आलं आहे. गणेश शिवाजी पंडित असं अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचं नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वसतीगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वसतीगृह बंद पडल्यानंतर या वसतीगृहात दाखल पाच मुलींना जळगाव आतील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी मुली या ठिकाणच्या वातावरणात रुळ्ल्या. विश्वास संपादन झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधार गृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतीगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.

---Advertisement---

प्रकरण समोर आल्यानंतर जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. 2022 ते वसतीगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा काळजीवाहक गणेश पंडीत याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधिक्षिका आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने मुलींचे जबाब घेण्यात आले असून त्यानुसार पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles