Saturday, April 20, 2024
Homeराज्यआरोपींच्या स्वागतासाठी काढलेली मिरवणूक अंगलट, काही मिनिटातच पुन्हा आरोपींना केलं गजाआड !

आरोपींच्या स्वागतासाठी काढलेली मिरवणूक अंगलट, काही मिनिटातच पुन्हा आरोपींना केलं गजाआड !

मुंबई : हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेले पाचही आरोपी  तुरुंगातून सुटले. मात्र त्यानंतर या आरोपींच्या चाहत्यांनी आरोपींच्या स्वागतासाठी मिरवणूक काढल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग झाला. या आरोपावरून आरोपींच्या स्वागतासाठी मिरवणूक काढणं आरोपींच्या साथीदारांना चांगलंच महागात पडलं आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मिरवणूक काढल्याच्या कारणास्तव पोलिसांनी यातील आरोपींना पुन्हा बेड्या ठोकल्या. त्यामुळे आरोपींनी तुरुंगातून सुटल्यानंतर केलेला जल्लोष, आरोपींचा आनंद फारकाळ टिकला नाही. पोलिसांनी पाच आरोपींना पुन्हा अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कबीर मुल्ला, अजमल कुरेशी, अफजल कुरेशी, मनोज व्यास, सादिक शेख या आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शुक्रवार (दि.६ जुलै) रोजी दाखल करण्यात आला होता.या पाचही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. मात्र शुक्रवार (दि.२८ जुलै) रोजी सर्व आरोपी तुरुंगातून सुटले होते. सुटका झाल्यानंतर आरोपींच्या स्वागतासाठी काही जणांनी ८ दुचाकीवरून रॅली काढली होती.या रॅलीत एकूण सुमारे २५-३० साथीदार सहभागी झाले होते.

या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना मिळताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग, तसेच नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुटलेल्या पाच जणांना पुन्हा अटक केली आहे. त्यामुळे तुरंगाच्या बाहेर आल्यानंतर जंगी स्वागत करणे आरोपींच्या अंगलट आले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर अशीच जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र याची चर्चा झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करून, टोळीतील अनेकांची धरपकड केली होती.

संपादन – रवींद्र कोल्हे


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय