Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाराज्यात सर्वसामान्यांची सत्ता येणार – रंगा राचुरे

राज्यात सर्वसामान्यांची सत्ता येणार – रंगा राचुरे

पुणे : सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले.

आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा पिंपरी चिंचवड मध्ये पोचली त्यावेळी ते बोलत होते. दि. २८ मे रोजी पंढरपूरहून निघालेली ही स्वराज्य यात्रा सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात पोचली. सांगवी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही यात्रा पिंपरी संत तुकाराम नगर जवळ छोट्या सभेमध्ये रुपांतरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चामुळे गरीबांना या सुविधा मिळू शकत नाहीत. यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला असून आज दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. आज दिल्लीत उत्तम अशा आरोग्याची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोचविण्याची ही यात्रा असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या उदंड प्रतिसादाने पिंपरी चिंचवड शहर दुमदुमून गेले होते. यावेळी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्यही सादर केले गेले. यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया, यात्रेसोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, विजय कुंभार, चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, अमर डोंगरे, स्मिता पवार यासह राज्याच्या विविध क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या स्वराज्य यात्रेत मोठी गर्दी केली होती.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय