Tuesday, March 18, 2025

नाटक दहा बाय वीस प्रेक्षकांच्या भेटीला, प्रयोगासाठी आजच संपर्क करा !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

एकविसावे शतक जरी सुरू असले तरी स्त्रियांचे शोषण होणे काही थांबले नाही. त्यात एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर ज्याने केला त्यापेक्षा जिच्यावर झाला तिला समाज दोषी ठरवतो.

हाच दृष्टिकोन बदलण्यासाठी कलाकार धनश्री साठे ही एक पात्री प्रयोग सादर करते. ज्यात नाटकातील पात्रात नायिकेवर घडलेल्या अत्याचाराचे वर्णन एका वेगळ्या दृष्टिकोनातून करून सामाजिक प्रबोधनाचे काम करते. तिच्या या नाटकाचे प्रयोग पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे.

आपणही आपल्या आजूबाजूच्या कॉलेज शाळा किंवा इतर सामाजिक संघटनांतर्फे हा प्रयोग आपल्या शहरात ,गावात आयोजित करू शकता.

हे नाटक कुठं होऊ शकतं ?

कुठेही 

कोरोनाच्या काळामध्ये सर्व नाट्यगृह बंद असल्याने दहा बाय वीस हा इंटरेस्टिंग नाट्यप्रकार जन्माला आला यामध्ये अत्यंत कमी जागा आणि कमी संसाधनामध्ये नाटक सादर केले जाते.

तुमच्या घरात, अंगणात, टेरेसवर, पार्किंगमध्ये, सोसायटीत, कॉलनीत, चाळीत, हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये, चावडीवर, वाड्यावर, बंगल्यावर, पारावर, शेतावर, वस्तीवर, पाड्यावर, चौकात, मंडळात, कॉलेजात, केंद्रात, संस्थेत, संघटनेत, शहरात, खेड्यात किंवा अजून कुठे ‘दहा बाय वीस फूट’ इतकी जागा असेल तर तिथे सुद्धा या नाटकाचा प्रयोग होऊ शकतो !पण फक्त ,१८ वर्षांवरील प्रेक्षकांसाठीच या नाटकाचा प्रयोग होऊ शकतो.

तरी आपल्या किंवा आपल्या ओळखीच्या संस्थांना याबद्दल माहिती द्या आणि प्रयोगासाठी किंवा अधिक माहितीसाठी  संपर्क करा :- 

धनश्री साठे  8208134175

या नाटकाचे दिग्दर्शन महेश खंदारे यांनी केले असून मूळ नाटक फ्रांका रामे यांनी लिहिले आहे.

#नाटकदहाबायवीस

Related Articles

- Advertisement -

Latest Articles