Tuesday, April 23, 2024
Homeराज्यभाजपच्या विरोधात तीन मुद्यांवर विरोधकांची होतेय एकजूट; सीताराम येच्युरींनी स्पष्टच सांगितलं

भाजपच्या विरोधात तीन मुद्यांवर विरोधकांची होतेय एकजूट; सीताराम येच्युरींनी स्पष्टच सांगितलं

सोलापूर : लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता संपुष्टात आणू पाहणा-या भाजपची उलटी गणती सुरू झाली आहे. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांची तीन मुद्यांवर एकजूट होत आहे. त्याचा परिणाम आगामी काळात दिसून येईल, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खा. सीताराम येच्युरी यांनी व्यक्त केला आहे.

गुरूवारी ते सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांनी संवाद साधला. यावेळी माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, राज्य सचिव डॉ. उदय नारकर, जिल्हा सचिव एम.एच.शेख आदी उपस्थित होते.

देशातील आर्थिक, सामाजिक, शेती, उद्योग आदी सर्व क्षेत्रातील परिस्थिती गंभीर बनत चालली असून सामान्य जनतेच्या दररोजच्या जगण्यावर हल्ला होत आहे. मोदी सरकारला त्याची चिंता नाही, अशी टीकाही येच्युरी यांनी केली.

येच्युरी म्हणाले, नवी दिल्लीत लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिला कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडले जात असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे नव्या संसद इमारतीचे राजेशाहीच्या थाटात उद्घाटन करण्यात मश्गूल होते. महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर ते मूग गिळून गप्प बसले आहेत.

आता देशातील परिस्थिती बदलत असून मोदींच्या विरोधात सामान्य जनतेचा आवाज पुढे येत आहे. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. येत्या १२ जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून त्यातून अनुकूल संदेश येईल, असेही येच्युरी म्हणाले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : आज लागणार दहावीचा निकाल, असा पहा निकाल

नागपूरचे ‘एम्स’ एनएबीएचची मान्यताप्राप्त देशातील पहिले रुग्णालय

जगातील सर्वाधिक 9 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर, कोण आहेत पहा !

आरक्षित नोकर भरतीबाबत राज्य सरकार घेणार “हा” मोठा निर्णय

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय