Wednesday, February 5, 2025

एकमेव राज्य : कोरोनामुळे पालक गमवलेल्या पाल्यांसाठी विशेष पँकेज, केरळ राज्य ठरतंय देशासाठी दिशादर्शक

केरळ : केरळ राज्य नेहमी देशातील आदर्श राज्य ठरले आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणांमुळे केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडी सरकारला निवडणूकांमध्ये केरळी जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. जनतेचा पाठिंबा आणि जनताभिमुख वाटचाल नक्की देशासाठी आदर्श ठरत आहे. असा एक निर्णय केरळ्या कम्युनिस्ट सरकारने घेतला आहे.

केरळ राज्य सरकारचा इतर राज्याना आदर्श निर्माण करणार निर्णय हाा निर्णय आहे. कोरोना महामारी मध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुला मुलींना 3 लाख रुपये मदत व प्रत्येक महिन्याला प्रत्यकी 2000 रुपये दिले जातील. तसेच या पाल्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे.

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्विट केले आहे की, “आम्ही कोविड-19 च्या काळात ज्यांनी पालक गमावले आहेत. अशा मुलांसाठी आम्ही एक विशेष पॅकेज प्रदान करू.  त्यांना 3 लाख रुपये मदत तर वयाच्या 18 वर्षापर्यंत मासिक 2000 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच अश्या पाल्यांचा पदवीपर्यंतचा खर्च सरकार करणार आहे.”

 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles