Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणअंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने दिलेले मोबाईल केले परत, कामात उपयोगी पडण्याऐवजी ओझे...

अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने दिलेले मोबाईल केले परत, कामात उपयोगी पडण्याऐवजी ओझे ठरतोय हा मोबाईल !

जुन्नर : राज्य सरकारने १४ जून २०१९ रोजी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील दैनंदिन कामाची माहिती पाठवण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते. परंतु हे मोबाईल कामात उपयोगी पडण्याऐवजी ओझे ठरत असल्याने अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनच्या वतीने आज (ता.१७) सरकारला पुन्हा हे मोबाईल पाठविण्यात आले.

अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनने म्हटले आहे की, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे आता तो सतत बिघडतो व तो बिघडल्यास  अंगणवाडी सेविकांनाकडून त्याचा दुरुस्ती खर्च वसूल केला जातो. मुळात हा मोबाईल कमी क्षमतेचा असून त्याची वॉरंटी देखील संपलेली आहे. तसेच त्यात महत्वाचे ऍप डाऊनलोड होत नाहीत.‌ त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या खाजगी मोबाईलवर काम करावे लागते असे संघटनेने म्हटले आहे.

तसेच, महाराष्ट्रातील सात संघटनांच्या कृती समितीने हा कामात उपयोगी पडण्याऐवजी ओझे ठरलेला मोबाईल असल्याने तो पुन्हा सरकारला परत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुका अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देत मोबाईल मधील सिम काढून घेऊन मोबाईल सरकारला परत करण्यात आला.

यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन जुन्नर तालुका समितीचे समन्वयक लक्ष्मण जोशी, अध्यक्षा शुभांगी शेटे, सचिव मनीषा भोर, उपाध्यक्षा तुळाबाई घोडे, सदस्या सुप्रिया खरात, सपना औटी, सदस्या रोहिणी गाढवे, सुशिला तांबे, कौशल्या बोऱ्हाडे, निलम गीते उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय