Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाप्रवाश्यांची दैना संपणार कधी ? कोल्हापूर नाक्यावर खाजगी वाहनांची बेबंदशाही

प्रवाश्यांची दैना संपणार कधी ? कोल्हापूर नाक्यावर खाजगी वाहनांची बेबंदशाही

कराड : गेले महिनाभर सुरु असलेल्या एस टी संपामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या हालअपेष्टा संपलेल्या नाहीत. कराड शहरातुन बेळगाव, बंगलोर, निपाणी सह मुबंई, पुणे, पिंपरी चिंचवड येथे जाणाऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशाना मिळेल ते खाजगी वाहन करून प्रवास करावा लागत आहे. 

कराड एस टी स्थानकावरून विटा, सांगली, पाटण, सातारा, भुईंज, जत, मिरज, पेठ, शिरोली, मायणी, फलटण, जेजुरी, महाबळेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर इ सर्व विभागात जाणाऱ्या प्रवाशांची रेलचेल थांबलेली आहे. दिवाळी पासून सुरू झालेली महाराष्ट्रातील या प्रवासी समस्यांकडे राज्यसरकार, लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केलेले आहे. 

कोल्हापूर नाका येथे उन्हात ताटकळत असलेल्या प्रवाशांच्या रांगा आता नेहमीच्या झाल्या आहेत. एखादी शिवशाही आली तरी नागरिक त्यावर तुटून पडत आहेत. कराड शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील मोक्याचे आणि व्यापारी शहर आहे.

क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, खासदार आमदार मंत्री यांना हे दिवस पहायचे वेळ न आल्यामूळे प्रवाशांचे दुःख समजणार नाही. एसटी महामंडळाच्या कामगार नेत्यांनी, सरकारी अधिकारी, पालक मंत्र्यांनी कोल्हापूर नाक्यावर उभे राहून पुण्या मुंबईचा कुटुंबासहीत प्रवास करावा.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय