Friday, April 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपेन्शन धारकांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा संपन्न, किमान साडेसात हजार रुपये पेन्शन देण्याची...

पेन्शन धारकांचा पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा संपन्न, किमान साडेसात हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : नवी सांगवी येथे EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर मेळावा पार पडला. या मेळाव्यात पेन्शन धारकांना किमान साडेसात हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत म्हणाले, कामगारांनी त्यांचे सेवा काळात पेन्शन फंडसाठी दरमहा अनुदान दिले आहे, आता त्यांना मिळत असलेली पेन्शन ही अत्यल्प आहे. यांची सरासरी अकराशे सत्तर रूपये आहे. या पेन्शन धारकांना जीवन जगण्याइतपत किमान साडेसात हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता तसेच वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कुठलाही भेदभाव न करता न्याय मिळवा. आमच्या मागण्या सरकाराने तातडीने मंजूर कराव्या अन्यथा संपुर्ण देशभर रस्ता रोखो करू असा इशारा कमांडर अशोकराव राऊत यांनी दिला. तसेच केंद्र सरकारने पेन्शन धारकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असेही ते म्हणाले.

या मेळाव्यास पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, मुळशी, पुणे, बारामती, दोड, सांगली, सातारा, संभाजीनगर, ठाणे, मुंबई या भागातील 3 ते 4 हजार पेन्शन धारक नागरिक उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी काळभोर यांनी केले व आभार शंकर शेवकर यांनी मानले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डाॅ.पी.एन. पाटील, क्षेत्रीय संघटक पश्चिम भारत सुभाष पोखरकर, राष्ट्रीय समन्वयक विलास पाटील, मुख्य समन्वयक पश्चिम भारत सी.एम. देशपांडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंह जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा शोभा आरस, मुख्य समन्वयक महिला सरीता नारखेडे, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, महाराष्ट्र अध्यक्ष एस.एन.अंबेकर, उत्तर प्रदेश मध्य झोनचे उपाध्यक्ष उमाकांत सिंह विसेन, मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, ठाणे जिल्हा अध्यक्ष मोहनसिंग राजपूत, नवी मुंबई अध्यक्ष विनायक तेंडुलकर, पुणे कार्याध्यक्ष सी.एम राऊत, पुणे जि. अध्यक्ष सतिश शिंदे, पुणे समन्वयक अजितकुमार घाडगे व अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

या मेळाव्याचे आयोजन पिंपरी-चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष विजय जगताप, जेष्ठ सल्लागार विजय राजपाठक, सचिव श्रीपाद जलवादी उपाध्यक्ष तानाजी काळभोर, खजिनदार सुरेश साळुंखे, महिला उपाध्यक्षा पुनम गुजर, के.पी.पाटील, नंदकिशोर डंबे, रमेश गोलांडे, अशोक भुजाडे, अशोक जाधव, चंद्रमणी ढापरे, छोटू ठोके, विलास ढमाले, पांडूरंग नाणेकर, केशव कोल्हापूरे, कुमार कुलकर्णी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय