Monday, July 15, 2024
HomeNewsपुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्याचे मराठी व्हर्जन घालतंय सोशल मीडियावर धुमाकूळ...

पुष्पा चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्याचे मराठी व्हर्जन घालतंय सोशल मीडियावर धुमाकूळ !

 

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ (Oo Antava) या गाण्यावर तिने डान्स केला. या गाण्यात समंथाने आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. अजूनही सोशल मीडियावर ‘ऊ अंटावा’ची क्रेझ पहायला मिळते. पार्ट्यांमध्येही हे गाणं वाजलं की त्याच्या हुकस्टेपवर सर्वांचे पाय थिरकतात. ‘पुष्पा’मधील हा आयटम साँग आतापर्यंत तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रत्येक भाषेतील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र आता चक्क मराठीत हे गाणं गायलं गेलं आहे. ‘ऊ अंटावा’चं मराठी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. याआधी ‘पुष्पा’मधील श्रीवल्ली या गाण्याचंही मराठी व्हर्जन सोशल मीडियावर गाजलं होतं.

रागिनी कवठेकर यांनी हे मराठीतील गाणं गायलं आहे. ‘ऊ बोलणार की ऊ ऊ बोलणार बाळा..’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला युट्यूबवर दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्समध्ये मराठी व्हर्जनचं कौतुक केलं आहे. श्रीवल्ली आणि ऊ अंटावानंतर ‘सामी’ या गाण्याचंही मराठी व्हर्जन आणावं, अशी मागणी काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये केली आहे. ‘ऊ अंटावा’चं मराठी व्हर्जन गावं, अशी कल्पना सर्वांत आधी रागिनीलाच सुचली. डॉनी हजारिका यांनी या गाण्याचं म्युझिक मास्टरिंग केलं आहे. तर शशांक कोंदविलकर यांनी या मराठी व्हर्जनचे बोल लिहिले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय