सोलापूर : वर्षानुवर्षे पीडित, पददलित,शोषित आणि सर्वहारा वर्गाची पिळवणूक भांडवली व्यवस्थेकडून झाली त्यातून श्रमिकांची, शोषितांची मुक्तता करण्यासाठी कार्ल मार्क्स आणि फेडरिक एंगल्स यांनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनाम्याचे लेखन करुन घोषणपत्र म्हणून जगाला 21 फेब्रुवारी 1848 साली बहाल केले. त्याची स्मृती व सिंहावलोकन करण्याच्या निमित्ताने 21 फेब्रुवारी हा दिवस रेड बुक दे साजरा करण्यात येतो. कारण हा जाहीरनामा म्हणजे शोषण विरहित समाज निर्माण करणारा आमूलाग्र ग्रंथ आहे.तसेच या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे श्रमिकांना गमावण्यासाठी फक्त हातातील बेड्या आहेत जिंकण्यासाठी जग पडले आहे.हा क्रांतिकारी विचार आत्मसात केला पाहिजे. असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली रेड बुक डे साजरा करण्यात आला. यावेळी जाहिरनाम्याची ध्वनिफीत श्रवण करण्यात आले.
ब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख आपल्या प्रस्ताविकात म्हणाले की, कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा म्हणजे ठोस परिस्थितीत ठोस विश्लेषण करून कालातीत निर्णय घेऊन समाजवादी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे.याचे मनन चिंतन,अध्ययन अव्याहतपणे केला पाहिजे.तरच श्रमिकांचे ध्येय गाठू शकतो.
रेड बुक च्या ध्वनिफित सादरीकरणा साठी तंत्र सहकार्य कॉ.सनी शेट्टी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या नगरसेविका कॉ.कामिनीताई आडम, सिध्दप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, म.हनिफ सातखेड, सुनंदा बल्ला, शंकर म्हेत्रे अनिल वासम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पक्षाचे जिल्हा समिती सदस्य कॉ.अनिल वासम यांनी केले.
युक्रेन मध्ये मृत्यूचा तांडव, रशियाने डागले बॉम्ब !
जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील “या” पर्यटन स्थळांचा समावेश
दहावी पास उमेदवारांसाठी संधी ! इंडियन बँकेत विविध पदांसाठी भरती
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती