शिरढोण येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती स्थळाला भेट
पनवेल / क्रांतीकुमार कडुलकर : “आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुध्द विविध जातीजमातींना एकत्र करून सशस्त्र लढा दिला. जुलमी राजवटीला उलथवून टाकण्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा क्रांतीकारकांच्या भुमीतून सदैव अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते”, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यातील, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिरढोण येथे संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सरपंच वैशाली भोईर, उपसरपंच वैभव मुकादम, ग्रामपंचायत सदस्य आदेश वाघमारे, कीर्ती वाडेकर, अंकिता मॅडम, ज्योती वासेकर, नेहा महाडिक, प्रीती गायकवाड, प्रियंका मुकदम, दीपक म्हात्रे, आदित्य साळुंखे, राम भोईर, सुदाम चौधरी, गणेश मोपी, धनाजी महाडिक, साधनाताई वासेकर, अविनाश वाकडीकर, तसेच महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सदस्य, शिरढोण ग्रामस्थ, तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240313-WA0294-1024x768.jpg)
संजोग वाघेरे पुढे म्हणाले की, “क्रांतीकार वासुदेव फडके यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा पुकारला. भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ पुढे देशभर पसरली आणि स्वातंत्र्य संग्रामारात रुपांतरीत झाली. म्हणूनच आपण त्यांना लढाऊ राष्ट्रवादाचे जनक मानतो. त्यांच्या कार्याची महती त्यांच्या या पवित्र भूमीला अभिवादन केल्यानंतर उमगते. या क्रांतीकारकांच्या या भूमीचा आशिर्वाद संघर्षासाठी सातत्याने प्रेरणा आणि लढण्यासाठी नवे बळ देत राहील. क्रांतिकारकांची ही जन्मभूमीचे हे ठिकाण उत्तम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील”.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240313-WA0292-1024x1024.jpg)
शिरढोण गावाबरोबर चिंचवण (ता.उरण) येथील श्री महालक्ष्मी मंदिर, तसेच परिसरात गावभेट दौ-यात गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरीक, युवक व माता भगिनींची भेट घेतली. त्यावेळी गावातील माता भगिनींनी औक्षण करत भव्य स्वागत केले. येथील कार्यकर्त्यानी सत्कार केला.