Monday, September 25, 2023
Homeजिल्हाभांडवली व्यवस्थेमध्ये संयुक्त कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली - भंते ज्ञानज्योती महाथेरो

भांडवली व्यवस्थेमध्ये संयुक्त कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली – भंते ज्ञानज्योती महाथेरो

वणी (यवतमाळ) : देशात दिवसेंदिवस साम्राज्यवाद व भांडवलीप्रधान प्रवृत्ती वाढत आहे. अनेक सामाजिक समस्या जटील होत समाजात भांडवली व्यवस्थेमुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली असल्याचे मत नुकतेच सम्यक बुद्ध विहार मेघदूत कॉलनी चिखलगाव येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रमात भंते ज्ञानज्योती महाथेरो यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, समाजात मध्यमवर्गीय माणसाकडे भौतिक साधनाची रेलचेल असल्याने त्यांची समाजा सोबतची नाळ तुटलेली आहे, तो आपल्याच सुखात मग्न असून एककल्ली होत आहे.त्याचे रुपांतर एक वस्तू म्हणून झाले असून उपभोग झाला की सोडून देणे अशी झाली आहे. त्यामुळे नाते संबंध सुद्धा स्वार्थानं लिप्त झाले आहे. मी आणि माझेच सुख ह्यामुळे त्याची संयुक्त कुटुंब व्यवस्था पार खिळखिळी झाली आहे. ही खिळखिळी झालेली व्यवस्था पुन्हा सुरळीत आणावयाची असेल तर बुध्द धम्मात सांगितलेले आर्य अष्टांगिक मार्ग हाच एक पर्याय आहे.

याच प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ . विश्वजीत कांबळे, पांढरकवडा हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले “बौद्ध साहित्य म्हणजे मानवी जीवनाचे सौंदर्यशास्त्र आहे.” डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ म्हणजे आधुनिक काळातील बौद्ध साहित्याचे आधुनिक त्रिपिटक होय, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विजय खोब्रागडे, सरपंचा रूपाली कातकडे, ग्रापं सदस्य अतुल चांदेकर, सुचिता भगत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष लिलाबाई वासेकर यांनी स्वागत पर भूमिका विशद केली. अरुण कोयरे यांनी प्रस्ताविक केले. सुचिता पाटील यांनी सुंदर सूत्रसंचालन केले तर आभार नीता बहादे यांनी मानले.

“कारवा निळ्या पाखरांचा” बुध्द भिम गिताचा बहारदार कार्यक्रमाचे अजिक्यं तायडे व शुध्दोदन पाटील व त्यांचा संच यांनी सादरीकरण केले. हा भव्यदिव्य कार्यक्रम मेघदूत कॉलनी मधील विशाखा बहुउद्देशीय महिला मंडळ, सम्यक बुद्ध विहार समिती, गौतमी महिला बचतगट आणि मैत्रीपुरुष बचतगट यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बहादे, भानुदास कांबळे, कवडू पाटील, हरीश वासेकर, अनिल पाटील, सचिन वानखेडे, संदेश बारशिंगे, सौरभ बहादे, विशाल भालशंकर, राकेश सोनटक्के, संगीता तेलंग, प्रणिता वासेकर, मेघा बारशिंगे, मंजुषा करमणकर, उज्वला ठमके, निर्मला करमणकर, नीता ब्राह्मणे, मुकेश वानखेडे, अमर ठमके, मेघा कोयरे, बालशंकर सर, सिसले सर, अमोल कांबळे, रत्नमाला कांबळे, हर्षल बहादे, बंटी वाघमारे, अमोल वासेकर, मीनाक्षी वानखेडे, राजेश धोटे, दुर्योधन शेंडे, संदीप पुसाटे, वंदना मोटघरे, प्रियांका वासेकर, पुणम गोहने, स्वाती जोगदंडे, अमोल शंभरकर, प्रियंका गजभिये, कमलाबाई जांगडे, वर्षा डांगे, महेंद्र तामगाडगे, सुनिता तामगाडगे, प्राची पाटील, उषाताई बारशिंगे, ज्ञानेश्वर तेलंग, विमला सोनटक्के, प्रीती वानखेडे, वंदना बालशंकर, सरला बहादे, धरती पुसाटे, संगीता वाघमारे, आकाश जोगदंडे, दिलीप कांबळे, अशोक मेश्राम, रजनी मेश्राम, सचिन शेंडे, दिलीप सोनटक्के, चेतन गजभिये, यशवंत मोटघरे, अविनाश करमणकर तथा उपासक, उपासिका मेघदूत कॉलनी चिखलगाव यांनी प्रयत्न केले.

 हे ही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

संबंधित लेख

 


लोकप्रिय