Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा संयुक्त जयंती सोहळा उत्साहात साजरा

जुन्नर / आनंद कांबळे : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती सोहळा जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत जुन्नर तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

---Advertisement---

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

या जयंती सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन नाडेकर हे होते. याप्रसंगी जुन्नर तालुका आदिवासी विचार मंच सचिव ज्ञानेश्वर दाभाडे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंकुश साबळे,  ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन लांडे, जुन्नर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेश दुरगुडे, अखिल पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष मोहरे, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, यांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली तसेच आदिवासी समाजाच्या प्रश्नांविषयी चर्चा केली.

---Advertisement---

याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक संघ महिला आघाडी सरचिटणीस सरला सांगडे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ संपर्क प्रमुख माया शेळकंदे, कोषाध्यक्ष निशा दिघे, शिक्षक संघ कोषाध्यक्ष निवृत्ती दिवटे, प्रवक्ते दत्तात्रय उगले, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठल जोशी, सरचिटणीस सतीश बुळे, शिक्षक संघ प्रवक्ते दिपक मुंढे, नेते सदु मुंढे, जुनी पेन्शन हक्क संघटन कार्याध्यक्ष भरत घोटकर, जेष्ठ मार्गदर्शक शंकर मुंढे, पंढरीनाथ लांडे, मुकुंद दिघे, अंकुश कोकणे, संजय खुटाण, विठ्ठल शेळके, रमेश दाभाडे, पंढरीनाथ शेळकंदे, राजेंद्र मते, विरणक सर, शरद घोगरे, मडके साहेब, शंकर जढर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सचिन नांगरे यांनी केले अध्यक्षीय मनोगतानंतर आभार प्रदर्शन आदिवासी विचार मंच अध्यक्ष मोहन उंडेे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles