Friday, March 29, 2024
Homeआरोग्यबायकोला डास चावला म्हणून नवऱ्याची थेट पोलिसांकडं तक्रार!

बायकोला डास चावला म्हणून नवऱ्याची थेट पोलिसांकडं तक्रार!

चंदिशी एका खासगी रुग्णालयात एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रसूती झाली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला.
नवरा-बायकोचं एकमेकांवर किती जीवापाड प्रेम असतं, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.
याचीच प्रचिती उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात आलीये.

इथं एका तरुणाच्या पत्नीला डास चावल्यामुळं त्यानं चक्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.

चंदौसीतील एका खासगी रुग्णालयात एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रसूती झाली आणि तिनं एका बाळाला जन्म दिला. मात्र, या रुग्णालयात अनेक डास होते व ते सतत महिलेला दंश करीत होते. त्यानंतर तिच्या नवर्‍यानं थेट पोलिसांकडं डासांबाबत तक्रार केली.

मला लगेच एक मॉर्टिन कॉईल द्या’

यूपी पोलिसांना (UP Police) टॅग करत त्यानं ट्विट केलं. ट्विटमध्ये त्यानं म्हटलं की, माझ्या पत्नीनं चंदौसी हरी प्रकाश नर्सिंग होमममध्ये (Chandausi Hari Prakash Nursing Home) एका छोट्या परीला जन्म दिला आहे. माझी पत्नी वेदनेनं तडफडत आहे. तिला डास खूप चावत आहेत. कृपया, मला लगेच एक मॉर्टिन कॉईल द्या, अशी त्यानं पोलिसांकडं विनंती केली.

यूपी पोलिसांची त्वरित कार्यवाही


त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार गांभीर्यानं घेत या व्यक्तीच्या ट्विटला रिप्लाय दिला. यूपी पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलंय, माफियापासून डासांपर्यंतचे निदान. नर्सिंग होमममध्ये आपल्या नवजात बाळाला आणि प्रसूती झालेल्या बायकोला डासांपासून आराम मिळावा म्हणून एका व्यक्तीनं ट्विट करून मदत मागितली. यूपी पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली आहे. नर्सिंग होमममध्ये मॉस्किटो क्वाईल पोहोचवलं आहे. त्यानंतर या माणसानं पोलिसांचे आभार मानले आहेत.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय