Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणमोठा अनर्थ टळला, शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले

मोठा अनर्थ टळला, शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले

सुरगाणा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ रस्तावर कोसळलेले वडाचे झाड

सुरगाणा / दौलत चौधरी :सुरगाणा शहराजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वडाचे झाडापैकी एक झाड पावणे पाच वाजेच्या  सुमारास अचानक उन्मळून रस्त्यावर मध्यभागी पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. याबाबत तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागास कळविले असतात. हसिलदार राजेंद्र मोरे यांनी तातडी ने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवित जेसीबी लावून झाड हटविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाची रिपरिप सुरु असताना हे झाड कोसळले आहे. त्याची मुळे उघडी पडुन मातीचा भराव वाहुन गेल्याने झाड पडले आहे. याच वेळी एखादे वाहन अथवा दुचाकी स्वार आला असता तर खुप मोठी जिवित हानी झाली असती. उंबरठाण रस्त्यावरील वाहतूक एक ते दीड तास ठप्प झाली होती. यावेळी आपल्या डयुटीवरुन  परतणाऱ्या चाकरमानी यांची चांगलीच पंचाईत झाली. दुचाकी स्वारांनी तर जीवाची पर्वा न करता कडेला असलेल्या गुडघाभर गटारीतून मार्ग काढत दुचाकी वाहने काढली. 

सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे जुने 

झाड असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सात वडाची झाडे असल्याने उन्हाळ्यात प्रवासी, दुचाकी स्वार सावलीत थांबत होते तर दुसरीकडे या  भागात पक्षांचे घरटे असल्याने नेहमी पक्षांचे सुमधुर आवाज कानी पडत होते.

वृक्ष हटविण्याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व नैसर्गिक आपत्ती विभाग तहसिलदार कार्यालय सुरगाणा यांनी एक ते दीड तासात झाड हटविले असून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आल्याने  नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

जलपरिषद मित्र चे रतन चौधरी म्हणाले, “सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. जलपरिषद व वृक्ष मित्र तसेच वृक्ष प्रेमी नागरिकांनी रस्त्यावरून येता जाता याच वडाच्या झाडाच्या फांद्या छाटून घेत कार्यालयीन आवारात, शिक्षक, विद्यार्थ्यांनी शालेय आवारात, सार्वजनिक मोकळ्या जागेत, गणेश मंडळे, मंदिराच्या आवारात वटवृक्षाची लागवड केल्यास शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडापासून शेकडो रोपटी तयार झाल्यास या वटवृक्षास नवसंजीवनी मिळेल.”


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय