Sunday, July 14, 2024
Homeजिल्हासरकार मोफत धान्य आणखी चार महिने देणार !

सरकार मोफत धान्य आणखी चार महिने देणार !

पुणे : अत्यंत आनंदाचा निर्णय केंद्र सरकारने देशातील शिधापत्रिकाधारकांसाठी घेतला आहे. मोफत अन्न-धान्य योजनेला डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण २७ लाख ११ हजार १५९ तर पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२ लाख ६९ हजार शिधापत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्तीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यातील तांदूळ आणि गहू चांगल्या दर्जाचा मिळाला असल्याचे पुणे शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना ढोले म्हणाले, चांगले सहकार्य भारतीय अन्न महामंडळाकडून मिळत आहे. या महिन्यातही रेशनवरील गहू अन् तांदूळ चांगल्या दर्जाचे मिळाले आहेत. चालू महिन्यात पुणे शहरासाठी जवळपास १२ हजार ६०० मेट्रिक टन एवढा तांदूळ आणि गहू मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास ९४.५ टक्के वाटप करण्यात आले.

पुणे तसेच पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना वेगवेगळ्या कारणास्तव धान्य घेता येत नाही किंवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय