Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार !

---Advertisement---

---Advertisement---

संग्रहित छायाचित्र

आरेकडून वन विभागाला 812 एकर जागेचा ताबा

मुंबई : संजय गांधी उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार आरे ची 812 एकर जागा जंगल म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यानुसार आज 286.732 हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपविला. आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीयांकडून मुख्य वनसंरक्षक यांना हा ताबा मिळाल्याने मुंबईसारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता .

बोरिवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत वनक्षेत्राचा ताबा घेण्यात आला. यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे. 

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय, तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

बोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा ताबा देण्यात आला आहे. आरे येथील 125.422 हेक्टर, गोरेगाव येथील 71.631 हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील 89.679 हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील 40.469 हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने 812 एकर जागेवर आता वन विभाग जंगल फुलवू शकते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles