Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

स्वार्थी मुलांना बापाने चांगलाच इंगा दाखवला, करोडोंची संपत्ती शाळा आणि रुग्णालयासाठी केली दान

वृद्धापकाळात मुलांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने अनेक ज्येष्ठांना आपले उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात काढावे लागते. मात्र, त्यांच्या संपत्तीवर मुलांचा डोळा असतो.अशाच स्वार्थी मुलांना एका बापाने चांगलाच इंगा दाखवला आहे. वृद्धापकाळात सेवा न केल्याने एका 85 वर्षी व्यक्तीने त्यांची कोट्यवधींची मालमत्ता मुलांना न देता राज्यपालांच्या नावे सरकारला दान केली आहे. एवढंच नव्हे तर सरकारने या जागेवर शाळा किंवा रुग्णालय बांधावे, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्परनगर जिल्ह्यातील खतौली हे हा प्रकार घडला आहे. 85 वर्षीय नाथू सिंह यांच्या मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही. त्यामुळे नाथू सिंह यांना आश्रमात राहावे लागले. अनेक महिने ते आश्रमात राहत होते. दुसरीकडे, मुलांवर रागावलेल्या नाथू सिंहने आता त्यांना आपल्या मालमत्तेतून बेदखल केले आहे.

यासोबतच ही संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या नावावर करण्यात आली आहे. नाथू सिंह यांच्या मालमत्तेची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. मृत्यूपत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांच्या जमिनीवर सरकारने शाळा किंवा रुग्णालय बांधावे. इतकंच नाही तर नाथू सिंह यांनी मुलांकडून अंत्यसंस्काराचा अधिकारही काढून घेतला असून मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुळचे बिराल गावचे रहिवासी असलेले नाथू सिंह यांच्या कुटुंबात 4 मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्ने झाली आहेत. तर मुलगा लग्नानंतर सहारनपूरमध्ये कुटुंबासोबत राहतो. येथे तो सरकारी शिक्षक म्हणून काम करतो. नाथू सिंह यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांनी त्यांना एकटे सोडले. सध्या नाथू सिंह हे खतौली शहरातील एका आश्रमात राहत आहेत. गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते आश्रमात राहत आहेत. यादरम्यान त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना भेटायला आला नाही.

खतौली वर्धा आश्रमाच्या संचालिका रेखा सिंह यांनी सांगितले की, नाथू सिंह जी अनेक महिन्यांपासून वर्धा आश्रमात राहत आहेत. कुटुंबातील कोणीही सदस्य त्यांना एकदाही भेटायला आला नाही. नथू सिंह यांनी शनिवारी तहसील गाठले आणि आपली सर्व मालमत्ता उत्तर प्रदेश सरकारला सुपूर्द केली. नाथू सिंह यांच्या मालमत्तेत एक घर आणि सुमारे 10 एकर शेतजमीन आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles