Thursday, July 18, 2024
HomeNewsएका रात्रीत बदलले ६० वर्षीय मजुराचे नशीब !

एका रात्रीत बदलले ६० वर्षीय मजुराचे नशीब !

 

मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा साठ वर्षीय म्हातारा चक्क एका रात्रीत श्रीमंत झाला आहे. अशीच काहीशी घटना घडली केरळमधल्या एका मजूरा सोबत. केरळच्या कोझिकोड येथील मजुरी करणाऱ्या साठ वर्षाच्या मम्मीक चे आयुष्य एका रात्रीत बदलले .

एका लोकल फर्मच्या प्रमोशनसाठी मम्मीकने भारी सूट, हातात आयपॅड घेऊन फोटोसेशन केले आहे .त्याचा चेहरा विनायकं या अभिनेत्याची मिळताजुळता असल्याने अल्पावधीतच सोशल मीडिया वरती या व्हिडिओला लोकप्रियता मिळाली .

त्याचे हे धमाकेदार फोटो काढले आहेत तो छायाचित्रकार शरीक म्हणतो “मी जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिलं त्यावेळेस मला त्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही मी माझे पुर्ण कौशल्य वापरून त्यांचे फोटो काढले आणि अल्पावधीतच ते व्हायरल झाले”.असं म्हणतात ना देने वाला जब भी देता, देता  छप्पर फाडके !अशीच अवस्था त्या मजुराची झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय